*विद्युत प्रवाह बंद झालेले हाय व्होल्टेज तार तात्काळ हटवून जनतेला भयमुक्त करा..: आम आदमी पार्टी*
*१५ दिवसाचा आत एम ई सी बी विभागाने कार्यवाही न केल्यास जनतेला घेऊन तीव्र आंदोलन करु : राजू कुडे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी आप*
हिंदुस्थान न्यूज24: रेखा चंडाले
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून डॉ. आंबेडकर नगर प्रभागामध्ये विद्युत प्रवाह बंद असलेले हायहोल्टेज केबल लोम्बकाळत असून अनेक पोल पडण्याचा अवस्थेत आहे. भविष्यात यामुळे मोठी जीवित हानी होऊ नये म्हणून याबाबत पीडित जनतेनी आम आदमी पक्षाचे राजू कुडे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी प्रशासनाला १५ दिवसात केबल, तार, पोल हटवण्यासंदर्भात निवेदनातून अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, महानगर संघटनमंत्रीसंतोष बोपचे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, महानगर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, प्रशांत रामटेके इत्यादी उपस्थित होते.
0 Comments