कृषी महोत्सव आणि वधू - वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम : आ. किशोर जोरगेवार

•कृषी महोत्सव आणि वधू - वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम : आ. किशोर जोरगेवार

हिंदुस्थान न्यूज 24  : रेखा चंडाले 
चंद्रपूर डिस्टिक रिपोर्टर

 
चंद्रपूर:कुणबी समाज नेहमीच मेहनती, प्रामाणिकपणा आणि परंपरांचे जतन यासाठी ओळखला जातो. या कृषी महोत्सवाच्या आणि वधू-वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्र आणि सामाजिक एकता अधिक बळकट केली आहे. हे एकत्रीतरित्या आयोजित झालेले आयोजन म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
कुणबी समाजाच्या वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपूते, श्रीधर मालेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अनिल धानोरकर, मनोहर पाउनकर, सुनील मुसळे, अजय जयसवाल, विलास माथनकर, माजी नगरसेवक वाढई, विनोद पिंपळशेंडे, अतुल देउळकर, अरुण मालेकर, प्रा. अनिल डाहाके, प्रा. मोरे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलो आहे. त्यामुळे माझ्यावर आता अधिकची जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत अनेक विकासकामे आपल्याला करता आली. तर अनेक विकासकामे या पाच वर्षांत करण्याचा निर्धार आपण केला आहे. मतदारसंघात मोठ्या अभ्यासिका आपण तयार करत आहोत. तसेच अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
 वधू-वर परिचय मेळावा म्हणजे नव्या नात्यांची सुरुवात आहे. हे नाते केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबे, संस्कृती आणि संपूर्ण समाजाची बांधिलकी दर्शवणारे असते. आज येथे उपस्थित तरुण-तरुणींनी एकमेकांची ओळख करून घेऊन नव्या वाटचालीस सुरुवात करावी. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील नवसंकल्पना आणि सरकारी योजनांची माहिती मिळते. आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचे मार्ग यातून शोधता येतात. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
  आपण कुणबी समाजाच्या अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. यातून मोठी अभ्यासिका तयार होत आहे. येथे साहित्य खरेदीसाठी आणखी 50 लक्ष रुपयांच्या निधीची मागणी समाजाच्या वतीने आली असून साहित्य खरेदीसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. सोबतच घुग्घूस येथे कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून तेथेही अभ्यासिका बांधकामासाठी आपण 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments