झाडीबोली साहित्य संमेलन वरोरा येथे " काय म्हणतील लोक " या कवितासंग्रहाच

• झाडीबोली साहित्य संमेलन वरोरा येथे " काय म्हणतील लोक " या कवितासंग्रहाच 

हिंदूस्थान न्यूज24 रेखा    चंडाले 
 डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 
वरोरा : झाडीबोली साहित्य मंडळ साकोली द्वारा आयोजित, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा  च्या रोप्य महोत्सवी पर्वावर दिनांक २८/१२/२०२४ ला " झाडीबोली साहित्य संमेलन " श्रद्धे बाबा आमटे साहित्य नगरी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाले.
  या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये, कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मान. श्री लोकराम शेंडे ज्येष्ठ साहित्यिक, कार्यक्रमाचे उद्घाटक  मान. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्र, प्रमुख पाहुणे  विकास आमटे समाजसेवक आनंदवन, ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. हरिश्चंद्र बोरकर  यांचे शुभहस्ते  नवं कवी नीरज आत्राम लिखित  " काय म्हणतील लोक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमाला  इंजि. भाऊ थुटे  प्रसिद्ध प्रबोधनकार,  आ.सुधाकर अडबाले शिक्षक आमदार चंद्रपूर, डॉ. हेमकृष्ण कापगते,  ऍड. लखनसिंह कटरे, हिरामणजी लांजे, राजन जयस्वाल, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य  ना. गो. थुटे या आदरणीय पाहुण्यांची  प्रमुख उपस्थिती लाभली. या कवितासंग्रहाला  साहित्यिक  अशोक कुबडे ' गोंडर ' कार यांची प्रस्तावना लाभली, तर सौ. प्रांजली काळबेंडे मुंबई,  आनंद घोडके सोलापूर,डॉ.  श्याम मोहरकर चंद्रपूर, यांच्या शुभेच्छा लाभल्या.या कार्यक्रमाला बहुसंख्या कवी,कवयित्री साहित्यिक, कलाकार, आणि बहुसंख्य लोकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी सर्व मान्यवर पाहुण्यांनी कवी नीरज आत्राम यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments