चंद्रपूर मनपा व डॉ.खत्री महाविद्यालयांत सामंजस्य करार
पर्यावरण संवर्धनासाठी करणार जनजागृती
हिंदुस्थान न्यूज 24:रेखा चंडाले
डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
चंद्रपूर २७ डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिका व डॉ.खत्री महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला असुन याअंतर्गत वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन या पर्यावरण विषयक महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल व डॉ.खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने झालेल्या या सामंजस्य करारानुसार मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन, ई वाहने,प्लास्टीक बंदी,कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी उपक्रमांविषयी आता डॉ.खत्री महाविद्यालयातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.
शासन निर्देशानुसार चंद्रपूर मनपातर्फे पर्यावरण विषयक महत्वाच्या सर्व विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या स्पर्धा, उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे असते,कारण जनसहभागातूनच पर्यावरण संवर्धन व रक्षण करणे शक्य आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जर नागरिकांची साथ मिळाली तर कोणताही उपक्रम यशस्वी होणे शक्य होते.
मनपातर्फे दर महिन्यास पर्यावरण विषयक उपक्रमांची जनजागृती करण्याचे ठराविक लक्ष महाविद्यालयास देण्यात येणार असुन महाविद्यालयातर्फे योजनाबद्ध रीतीने परिणामकारक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे व केलेल्या कामांची माहिती मनपास देण्यात येणार आहे.महाविद्यालयांच्या सहभागाने युवा वर्गाचा पर्यावरण संरक्षण व संवर्धनात सहभाग होणार असुन याचप्रकारे इतर महाविद्यालयांनीही सहयोग करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
0 Comments