भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशव्यापी धरणे आंदोलन!

भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशव्यापी धरणे आंदोलन! 

हिंदुस्थान न्यूज 24: रेखा चंडाले
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर 

भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिल चंद्रपूर तर्फे नुकतेच अदानी उद्योगमधील भ्रष्टाचार, वाढती महागाई ,बेरोजगारी तसेच मणिपूर राज्यात शांतता स्थापित करण्यासाठी व ईव्हीएमच्या विरोधात देशव्यापी धरणे व निदर्शने करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना एका शिष्टमंडळाने काल चंद्रपूरात एक निवेदन सादर केले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड प्रकाश  रेड्डी , काॅम्रेड राजू गैनवार, भाकपा 
कॉम्रेड रवीद्र उमाटे 
कॉम्रेड अरविंद कुमार यांनी केले 
या वेळी नारेबाजी करण्यात आली.उपस्थित नेते मंडळीची  मार्गदर्शनपर भाषणे झालीत .
भाजपा विरोधात जनतेत नाराजी होती.
 देशात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत महागाई व बेरोजगारी हे सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे राज्य व देशातील भाजपा सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केले आहे.ईव्हीएम घोटाळया बाबत  जनतेच्या मनात शंका - कुशंका निर्माण होत आहे येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात याव्यात आदिं विषय निवेदनात नमूद करण्यात आले होते.
भारतीय कॅमुनिस्ट पक्षाच्या वतीने काल चंद्रपूरात देशव्यापी धरणे व निदर्शने आंदोलन  झाले.

Post a Comment

0 Comments