*धाबा येथे होणार सुसज्ज वाचनालय.*
हिंदुस्थान न्यूज24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
गोंडपिपरी, दि. १२
राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांच्या विनंतीनुसार तालुक्यातील धाबा येथे सुसज्ज वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जिल्हा खनिज निधीअंर्गत १४९.६२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
धाबा येथील विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अशा वाचनालयाच्या निर्माणासाठी आमदार देवराव भोंगळे हे प्रयत्नरीत होते; त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून लवकरच धाबा येथे सुसज्ज वाचनालय निर्माण होईल. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षा व अन्य शासकीय नोकरभरतीची तयारी व अभ्यास करणाऱ्या परीसरातील होतकरू विद्यार्थ्यांना होणार आहे.
या वाचनालयाच्या बांधकामाकरीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, माजी जि. प. सदस्या वैष्णवी बोडलावार, स्वाती वडपल्लीवार, तालुका महामंत्री गणपती चौधरी, निलेश पुलगमकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुण, भाजयुमोचे महामंत्री स्वप्निल अनमुलवार, अरुण कोडापे, हिराचंद कंदीकुरवार, राजेंद्र गोहने, संजय येलमुले, चंद्रशेखर गरपल्लीवार, आशिष मामीडपल्लीवार, हरीश घोगरे, विठ्ठल चनकापुरे, संतोष गरपल्लीवार, निखिल चंदनगिरीवार, गणेश बावणे, विशाल बावणे, अनिकेत नामेवार, उध्दव हिवरकार, अखिल चंदनगिरीवार, राजू निकोडे, रुपेश पिपरे आदिंसह धाबा वासीयांनी आभार मानले आहेत.
0 Comments