२१ वर्षीय तरुणीचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्याभद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील घटना

२१ वर्षीय तरुणीचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील घटना 

हिंदुस्थान न्यूज24 रेखा चंडाले 
डिस्टिक रिपोर्ट चंद्रपुर

 भद्रावती :- एका २१ वर्षीय तरुणीने घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक १०  डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. साक्षी पांडुरंग मोंढे २१ असे मृत तरुणीचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की साक्षी ही चिरादेवी येथील रहिवासी असून साक्षी मोंढे हि मंगळवारी सायंकाळी चिरादेवी गावात तिच्या घरी ती एकटीच होती.घरातिल मंडळी बाहेरगावी गेली होती. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत साक्षीने घराच्या स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाहेरगावी गेलेले कुटुंबीय परत आले असता त्यांना साक्षी लटकलेली दिसली. मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच पालकांना जबरदस्त धक्काच बसला. घटनेची माहिती भद्रावती पोलीसांना  मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा दाखल केला. आत्महत्येचे कारण अजुनही समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments