महानुभाव परीषदेच्या सचिव पदावर विनोदबाबू गावंडे यांचे नियु
हिंदुस्थान न्यूज24:रेखा चंडाले
भद्रावती : अखिल भारतीय महानुभाव परीषद अंतर्गत चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महानुभाव परीषदचे अध्यक्ष तथा श्रीकृष्ण मंदिर लोणाराचे संचालक महंत श्री दिवाकरबाबा महानुभाव यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महानुभाव परीषदचे सचिव पदावर श्री.विनोद रामचंद्रजी गावंडे यांची नियुक्ती केलेली आहे.
विनोदबाबू गावंडे हे विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती येथे कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असुन चंद्रपूर जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्यवाहक आहेत.
विनोदबाबू गावंडे यांचे आजोबा कै.कवडूजीपाटील गावंडे, वडील कै.रामचंद्रपाटील गावंडे तर आई श्रीमती लीलाबाई गावंडे यांनी महानुभाव श्रीदत्तमंदीर साठगांव येथील अध्यक्ष पद भुषविले असून आईवडिलांचे कार्यकाळात त्यांनी महानुभाव श्रीदत्तमंदीर साठगांव येथे श्रीदत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमाबरोबरच प्रवचन, किर्तन, अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अहिंसा, आत्महत्या, महीला मेळावा, श्रीमद्भगवतगिता परीक्षा, बालसंस्कार शिबीर, स्वच्छता अभियान, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जंयती आदी कार्यक्रम घेवून समाजप्रबोधनाचे कार्य केले त्याचप्रमाणे संतमहंताचा आदर ठेवून महानुभाव पंथाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य आजही सुरू असुन सामाजीक कार्यात नेहमी सहभागी असतात.
त्यांचे या नियुक्ती बद्दल महंत न्यायबांसबाबा, महंत माहूरकरबाबा, महंत एकोव्यासबाबा, महंत मुधोव्यासबाबा, महंत परसराजबाबा, महंत वंकीराजबाबा आदीनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत
0 Comments