• सदस्यता नोंदणी ही केवळ प्रक्रिया नव्हे, तर विचारधारेचा प्रसार - आ. किशोर जोरगेवार• भाजपा सदस्यता नोंदणी गतीशील करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन

• सदस्यता नोंदणी ही केवळ प्रक्रिया नव्हे, तर विचारधारेचा प्रसार - आ. किशोर जोरगेवार

• भाजपा  सदस्यता नोंदणी गतीशील करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन


 
 चंद्रपूर:भातीय पक्षाची ताकद आणि तत्त्वे समाजाच्या कानाकोपऱ्यात  पोहोचवण्यासाठी सदस्य नोंदणी प्रक्रिया ही एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची पायरी आहे. भारतीय जनता पार्टी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून विचारांचा आणि देशसेवेचा प्रवाह आहे. हा प्रवाह प्रत्येकाला सामावून घेणारा, प्रत्येकाला विश्वास देणारा आणि सर्वांना एकत्र बांधणारा असून सदस्यता  नोंदणी ही केवळ प्रक्रिया नव्हे, तर विचारधारेच्या प्रसाराचा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे सदस्यता नोंदणी प्रक्रियेचे उत्तम नियोजन करुन ती गतीशिल करा अशा सूचना  आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
              सदस्यता नोंदणी प्रक्रियेबाबत नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते खुशाल बोंडे, विजय राउत, भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सविता कांबळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघूवीर अहिर, युवा मोचा अध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री सुरज पेदुलवार, किरण बूटले, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते दशरथसिंग ठाकुर, तुषार सोम, वंदना हातगावकर, सविता दंढारे, मनोज पाल आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि,  भारतीय जनता पक्षाशी जूळण्यासाठी नागरिकांमध्ये उत्तम प्रतिसाद आहे. मात्र आपण त्यांच्या पर्यत्त  पोहोचने गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उर्जावान आहे. त्याने आता घरघर अभियान राबवित सदस्यता नोंदणी यशस्वी करावी. आपण ज्यांना या प्रक्रियेत सहभागी करतो, ते फक्त पक्षाचे सदस्यच होत नाहीत, तर ते आपल्या तत्त्वांचे वाहक होतात. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी त्यांना मिळते, आणि आपल्या देशाच्या उन्नतीत त्यांचे योगदान असते. आजच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव मोठा आहे. या प्रक्रियेसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केल्याने ती अधिक सोपी, गतिमान, आणि पारदर्शक झाली आहे. मात्र आपण लोकांशी थेट संवाद साधण्याचे महत्त्व विसरू नये.  घरोघरी जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना आपल्या पक्षाच्या विचारांशी जोडणे, आणि त्यांना ही विचारधारा का महत्त्वाची आहे हे पटवून देणे, ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले.
 आपल्या पक्षाची मूलभूत तत्त्वे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचारांनी प्रेरित आहेत. या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार आपण आपल्या सदस्यांमार्फत करू शकतो. आपल्या पक्षाचा विस्तार हा केवळ एक संख्या वाढवण्याचा उपक्रम नसून, तो देशाच्या प्रगतीसाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपल्याकडे पूढील दहा दिवस आहेत या दहा दिवसात मंडळ पातळीवर, वार्ड पातळीवर विशेष उपक्रम राबवित सदस्य नोंदणी करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे माजी नगर सेवक, मंडळ अध्यक्ष, सर्व विभागाच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments