प्रशांत रामटेके सर: संघर्षातून घडलेले यशस्वी पत्रकार

प्रशांत रामटेके सर: संघर्षातून घडलेले यशस्वी पत्रकार

हिन्दुस्थान २४न्यूज: रेखा चंडाले
जिला प्रतिनिधी, चंद्रपुर 

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, प्रबोधिनी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारितेत आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रशांत रामटेके सरांचे कार्य अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नाही, तर समाजाला दिशा देणारा एक उजळ दीपस्तंभ असतो. हाच दीपस्तंभ बनण्याचे काम प्रशांत सर आपल्या निर्भीड आणि समाजहितैषी पत्रकारितेद्वारे करीत आहेत.

सामान्य माणसाचे प्रश्न असोत किंवा महिलांना अधिक संधी मिळवून देण्याचा निर्धार – प्रशांत रामटेके सरांनी पत्रकारितेला एका सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. त्यांनी अनेक नवोदित लेखकांना, पत्रकारांना आणि खासकरून महिलांना आपले विचार मांडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या माध्यमातून अनेक मुद्दे प्रकाशझोतात आले, अनेकांना न्याय मिळाला आणि अनेक विचारवंतांना आपले मत मांडण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले.

अल्पावधीतच प्रबोधिनी न्यूज नेटवर्क राज्यभर पोहोचवण्याचा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. पत्रकारिता, साहित्य, क्रीडा, कृषी, बेरोजगारी, सामाजिक प्रश्न यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ही समाजासाठी एक आश्वासक गोष्ट असते. त्यांच्या प्रामाणिक आणि समाजहितैषी कार्यामुळे त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या परिश्रमाला, निःस्वार्थ वृत्तीला आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाला मनःपूर्वक सलाम! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

“पत्रकारिता ही फक्त माहिती देण्याचे साधन नसून ती समाजाच्या मनाला आणि विचारांना आकार देणारी शक्ती आहे. हीच शक्ती प्रशांत रामटेके सरांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे.”


Post a Comment

0 Comments