गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बल्लारपूर पोलिसांनी केली अटक

गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बल्लारपूर पोलिसांनी केली अटक


हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 
बल्लारपूर : शहरातील एका गांजा तस्कर कडून गांजाची वाहतूक करताना बल्लारपूर पोलीसांनी सापळा रचत ५.१४७ किलोग्रॅम गांजा सहित ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई १५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता संत तुकाराम हॉल जवळील मार्गावर केले. तसेच आरोपी शाहरुख शेरखान पठाण (२९) व सईद उर्फ फिरोज खान अहमद खान (५१) दोन्ही राहणार रविंद्र वॉर्ड बल्लारपूर यांना अटक केले.

१५ मार्च रोजी रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की शेरखान पठाण हे बोलेरो वाहनाने गांजाची वाहतूक संत तुकाराम हॉल मार्गाने घरी गांजा घेऊन जाणार आहे.


त्या वरून गुन्हे शोध पथक चे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे सह पथकांनी सापळा रचला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन क्रं. एमएच ३४ बीजी ४६६९ येताना दिसली. त्या वाहनास थांबवून त्याची एनडीपीस कायद्या अंतर्गत झडती घेतली असता मागच्या शीट खाली दोन प्लास्टिक पिशव्या मध्ये ५ किलो १४७ग्राम गांजा मिळून आले.

आरोपी शाहरुख शेरखान पठाण (२९) व बोलेरो वाहन चालक सईद उर्फ फिरोज खान अहमद खान (५१) दोन्ही राहणार रविंद्र वॉर्ड बल्लारपूर यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील बोलेरो वाहन क्रं. एमएच ३४ बीजी ४६६९ मध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे घटक असलेला गांजा वनस्पतीचे पाने फुले विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने त्यांच्यावर एनडीपीएस अॅक्ट १९८५ मधील कलम २० (बी) (ii), २९, ८ (सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले. आरोपी कडुन एकूण ५ लाख ५५ हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केले.


सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक निलीमा बाबर, परि. पोलीस उपनिरीक्षक सौरभ साळुखे, परि. पोलीस उपनिरीक्षक सुनिल धांडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडित, पो.अं. प्रकाश मडावी, वशिष्ठ रंगारी, मिलींद आजम, खंडेराव माने, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, मपोअं. अनिता नायडु यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments