हिंदुस्थान न्यूज २४: संजय लोहकरे
प्रतिनिधी,चंद्रपूर
बल्लारपूर : दृष्टिहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर ही संस्था मागील कित्येक वर्षांपासून अंध व डोळस व्यक्तींनी मिळून अंधां करीता चालविलेली बिगर राजकीय संस्था आहे. या संस्थेचा उद्देश अंध अर्थात दृष्टीहीन व्यक्तींचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे आहे. यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करित असते. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ही संस्था कार्य करते. अंध लोकांच्या क्षेत्रात काम करणारी ही एक सेवाभावी संस्था आहे.
ही संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करित असते. या वर्षी सुद्धा संस्थेने सावित्रीबाई फुले स्मृती प्रित्यर्थ शनिवार दिनांक 29 मार्च 2025 ला संस्थेच्या मदतीकरीता डेअर संस्था, नागपूर द्वारा प्रस्तुत आर्केस्ट्रा 'मेलोडी लवर्सचे' आयोजन राजे बल्लाळशाह नाट्यगृह, कलामंदिर जवळ बल्लारपूर येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी चंदन सिंग चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य हे राहणार असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. रीना जनबंधू , अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर या राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्रेमानंद खंडाळे, रिता लाडे मॅडम, सरोज बद्दलवार मॅडम, सतिश मोहन, जनरल मॅनेजर, पावर प्लांट, बी. जी. पी. पी. एल. हे उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी जलतरण चे एशियाई रेकॉर्ड करणा-या 16 वर्षीय दिव्यांग जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचा संस्थेमार्फत गौरव करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास बल्लारपूर येथील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम व सचिव सतिश शेंडे यांनी आवाहन केले आहे.
0 Comments