हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले चंद्रपुर
चंद्रपूर, दि. 17 मार्च : कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयद्वारे राजस्तरीय क्रीडा महाकुंभ नाशिक येथे नुकताच पार पडला. या क्रीडा महाकुंभात राज्यातील सहा विभागातून कब्बडी चमू सामील झाले. यात आय. टी. आय राजुराच्या कब्बड्डी संघाने नागपूर विभागाकडून खेळताना राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकावले.
या उपविजेत्या संघाचा सत्कार कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सदर संघाला सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे प्राचार्य प्रणाली दहाटे यांनी संघाचे तसेच मार्गदर्शक शिल्पनिदेशक श्री. मद्देलवार, श्री. आईटलावार यांचे अभिनंदन केले.
तसेच विजेत्या खेळाडूचे राजुरा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आगमन होताच सर्व शिल्पनिदेशक, गटनिदेशक, सर्व प्राचार्य व प्रशिक्षणार्थांनी मिरवणूक काढत विजेते खेळाडू, संघांचे मार्गदर्शक व संघासोबत क्रीडा महाकुंभात सहभागी असलेल्या चमूचे स्वागत केले.
00000000
0 Comments