*प्रेस नोट*
Hindustan new 24:Rekha chandale distic reporter chandarapur
चंद्रपूर, [दिनांक]: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष श्री. सचिन भोयर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बार लायसन्स संदर्भात गंभीर आरोप करत प्रशासनाकडे त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसा तक्रार अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गोवडा, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक नितीन धार्मिक, पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांचेकडे सादर केला आहे.
श्री. भोयर यांच्या म्हणण्यानुसार, जील्हा दारूबंदी उठल्यानंतर काही बार मालकांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बार लायसन्स प्राप्त केले आहेत. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे निलंबित अधिकारी श्री. संजय पाटील यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांच्या कार्यकाळात नियमबाह्य कृत्ये आणि आर्थिक व्यवहार घडले आहेत.
श्री. भोयर यांनी विशेषतः पार्किंग संदर्भातील तफावत यावर लक्ष वेधले. त्यांचे म्हणणे आहे की, शासकीय नकाशावर जे पार्किंगचे ठिकाण दर्शवले गेले आहे, प्रत्यक्षात त्याची अनुपलब्धता आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगसंबंधी गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. याचबरोबर, बार लायसन्स मिळवण्यासाठी काही ठिकाणी फसवणूक केल्याचे आरोप आहेत.त्यांनी या संदर्भात त्वरित अँटी करप्शन ब्युरोला कारवाईसाठी सूचित केले आहे. लाच प्रकरणी निलंबित"श्री. संजय पाटील यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचे तपासणी करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी व बार मालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी," असे श्री. भोयर यांनी सांगितले. काही बार मालकांनी अस्वच्छ किचन, गैरप्रकाराने लायसन्स प्राप्त करणे, वेटर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न करणे इत्यादी गंभीर उल्लंघन केले आहेत. परमिट रूम शिवाय इतरत्र मद्यपाना करीता बसविण्यात येत आहे. शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेत बिअर बार उघडणे व बंद करणे अनिवार्य असतानाही जवळपास सर्वच बार हे मध्यरात्री पर्यंत सुरु असतात यामुळे त्यांचे लायसन्स त्वरित रद्द करणे आवश्यक आहे.पार्किंग सुविधा नसलेले बार, विशेषतः शहरी भागांतील बार,स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगसंबंधी समस्या निर्माण करत आहेत. यासाठी संबंधित बारांचे लायसन्स रद्द करणे किंवा नूतनीकरण थांबवावे,अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग नागपुर तसेच मुल रोड वर अनेक बिअर बार आहेत ज्यांच्याकडे पार्कींग व्यवस्था नाही. अश्या बिअर बार द्वारे राष्ट्रिय महामार्ग लगतच ग्राहकांची वाहने पार्क केली जात आहे. ज्यामुळे मोठा अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते.राष्ट्रीय महामार्ग कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अंतीर्गत, राष्ट्रीय महामार्गाच्या 500 मीटरच्या अंतरावर बार चालवणे कायदेशीर नाही. अशा बारांचे लायसन्स त्वरित रद्द करावं आणि त्यांचे नूतनीकरण होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी.
ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक अनुशासनाचे उल्लंघन करणारे बार देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहेत. यासाठी अशी बार त्यांचे लायसन्स रद्द करावे.शाळा, कॉलेज, मंदिर आणि धार्मिक स्थळांजवळ असलेले बार कायद्यानुसार बंद केले जात आहेत. अशा बारांचे लायसन्स त्वरित रद्द करावं.याशिवाय, पोलिस विभागाची मंजुरी (NOC) न घेणारे बार देखील नियमबाह्य ठरले आहेत. अशा बारांचे लायसन्स रद्द करणे किंवा नूतनीकरण रोखणे आवश्यक असल्याचे श्री. भोयर यांनी स्पष्ट केले.एकापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या बार मालकांचे लायसन्स नूतनीकरण न करणे किंवा ते त्वरित रद्द करणे आवश्यक आहे.
त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य दारूबंदी कायदा, 1949, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य कायदा, 1988, राष्ट्रीय महामार्ग कायदा, 1956, आणि महाराष्ट्र राज्य शहरी स्थानिक स्वराज्य कायदा, 1965 यांसारख्या कायद्यांच्या उल्लंघनामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेस धोका निर्माण होतो, असे मत व्यक्त केले.
"स्थानिक प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून संबंधित बार लायसन्स रद्द करावे, पार्किंग संदर्भातील तफावतीची चौकशी करावी आणि या सर्व प्रकरणांमध्ये कोणतीही भ्रष्टाचाराची कसर राहू न देण्याची कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन भोयर यांनी दिला आहे. यावेळी मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस नीतीन भोयर,शहर उपाध्यक्ष निखिल डांगे,संजय फारडे, चिरंजीव पॉल, मंगेश चौधरी सह अन्य उपस्थीत होते.
मनसे चंद्रपूर
कृपया ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या वृत्त पत्रात प्रकाशित करावी ही विनंती.🙏🏻
आपला
सचिन भोयर
मा.नगरसेवक , चंद्रपूर
0 Comments