आम आदमी पक्षा तर्फे शहरात ‘शहीद दिन’ साजरा
हिंदुस्थान न्यूज २४: संजय लोहकरे प्रतिनीधी,चंद्रपूर
बल्लारपूर : ज्या क्रांती विराने इंकलाब जिंदाबाद चा नारा दिला त्या शहिद-ए -आजम भगत सिंग यांना वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी 23 मार्च 1931 या दिवशी भगत सिंग यांचे सोबती सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती, कारण सन 1928 मध्ये इंग्रजांनी आणलेल्या सायमन कमिशन चा लाला लाजपत राय यांनी विरोध केला व इंग्रजांनी केलेल्या लाठी हल्यात लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी या तिघांनी पोलीस अधिकारी जान साँडर्स याची हत्या केली. त्यानंतर 1929 मध्ये भगत सिंग यांनी आपल्या याच साथीदारांसह दिल्ली मधील केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब फेकला व आत्मसमर्पण केले. सदर प्रकरणात 23 मार्च 1931 या दिवशी तिघांनाही फाशी ची शिक्षा झाली. म्हणून या शहिदांना 23 मार्च रोजी श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्यानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने बुद्ध नगर वार्डातील टिपू सुलतान चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव थापर, शिवराम राजगुरू यांचे स्मरण करून शहराध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले की, तरुणांनी शहीदांचा आदर्श सदैव स्मरणात ठेवावा व देशसेवेची प्रेरणा मिळावी. युवकांनी हुतात्म्यांचा आदर्श अंगीकारून देशसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले तसेच जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार व शिक्षण आघाडीचे अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. यावेळी शहर CYSS सचिव हर्षद खंडागडे यांनी शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या अखेरच्या पत्राचे वाचन केले तर CYSS शहर सह-संघटन मंत्री प्रबोधी ताकसांडे यांनी शहीद दिनानिमित्त निरोप दिले तर कार्यक्रमाचे संचालन युवा उपाध्यक्षा स्नेहा गौर यांनी केले.
शहराध्यक्ष रवि पुप्पलवार व जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मेनबती प्रज्वलन करून व सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर CYSS समितीचे मोठे योगदान होते.
या कार्यक्रमास आम आदमी पार्टी बल्लारपूर शहरातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments