Beed dist @,,
पंचायत समिती येथे दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात,पाय बसविणे कैलीपर्स यांचेc मोजमाप व ऑन द स्पॉट वितरण शिबीर संपन्न----
अन् दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आले हासू फुलेले ! ८० जणांना कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण---
हिंदुस्तान न्यूज:24 रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
पंचायत समिती येथे परळी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविणे कैलीपर्स यांचे मोजमाप व ऑन द स्पॉट वितरण शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 80 दिव्यांग बांधवानी लाभ मिळाला. ज्यावेळेस त्यांना हे कृत्रिम हातपाय लावण्यात आले, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता .
परळी पंचायत समिती सभागृह येथे दिव्यांग व्यक्तींचे जीवन थोड्या प्रमाणात का होईना सुसह्य व्हावे यासाठी त्यांना कृत्रिम अवयव दिले जातात.त्यांना आता आधुनिक पद्धतीने तयार केलेले कृत्रिम हात व पाय वितरण करण्यात येत आहेत. याकरिता जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, बीड रा.स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित व एस. आर. ट्रस्ट मध्यप्रदेश व अलीमको, परळी वैजनाथ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलीपर्स, स्प्लीट यांचे मोजमाप व तात्काळ (ऑन द स्पॉट) वितरण शिबीराचे सोमवार दि. 17 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ परळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे व स. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक प्रशासन अधिकारी निळकंठ दराडे, डॉ. रुपेश जाधव एस आर ट्रस्ट रातलम मध्य प्रदेश, रुक्मिणी सोनवणे, राम शर्मा, सुबेद्र ठाकूर, सुनील शर्मा, के.पी.सिग, सूर्या, मोनो हरि ओम शर्मा, दगडू भाळे व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पद्धतीचे हात किंवा पाय चांगले व दर्जेदार तसेच त्यांना त्याचा अगदी सहजासहजी वापर करता यावा. यासाठी आर्टिफिशियल लिम्ज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले आहेत. पंचायत समिती येथे कृत्रिम हात व पाय याचे मोजमाप व वितरण ऑन द स्पॉट करण्यात आले. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले नव्हते. विशेष म्हणजे कृत्रिम हात व पाय वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध असल्यामुळे ते दिव्यांग व्यक्तींना हाताळणे सोयीस्कर झाले. त्यांना पूर्वीसारखेच अवयव भेटल्याचा अनुभव घेता येणार असल्याचे त्यांनी स. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजी मुंडे यांनी सांगितले .
0 Comments