अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी MPSC पूर्व प्रशिक्षण

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी MPSC पूर्व प्रशिक्षण

हिन्दुस्थान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 


गडचिरोली, (जिमाका), दि. 17: जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने MPSC पूर्व प्रशिक्षण तसेच जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरती आणि IBPS, SSC परीक्षांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शालांत परीक्षा (10वी/12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्याच्याकडे रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने असून, दरमहा रु. 1,000/- विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज विनामूल्य उपलब्ध असून, उमेदवारांनी 1 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 या कालावधीत अर्ज भरून सादर करावा. त्यानंतर दिनांक 28 मार्च 2025 रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरक क्र. 2, गडचिरोली येथे मुलाखत घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments