जागर मराठी: शंकर महाकाली
हिंदुस्तान न्यूज 24:रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
भद्रावती : आज दिनांक.२ एप्रिल सायंकाळी पाच वाजता स्थानिक आमदार करण देवतळे यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत चर्चा केली व आपल्या मागण्यांसंदर्भात लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करू व आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे सूचित केले तसेच आंदोलकावरील विविध गुन्हे मागे घेण्यात येईल याबाबत गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष चर्चा करु. तसेच न्यू. इरा कंपनीच्या खोदकामाची चौकशी करून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येईल असे आमदार करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांना आवर्जून
सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार साहेबांनी सुद्धा १०दिवसांनंतर प्रथमच धरणे आंदोलन स्थळी भेट दिली
यावेळी अनेक महिला, पुरुष प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments